शिक्षण क्षेत्राच्या मूलभूत पुनर्रचनेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020) समोर आले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सर्वसमावेशक शिक्षण, कौशल्याधारित अभ्यासक्रम, तसेच राष्ट्रीय व जागतिक स्तरावरील स्पर्धात्मकता वाढवण्याच्या दृष्टीने या धोरणात अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत.
सर्वांसाठी समतामूलक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या उद्देशाने नवीन धोरणात शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर महत्त्वपूर्ण बदल सुचवले गेले आहेत. प्रारंभी बाल्यावस्थेतील शिक्षण, मुलांना शिकण्याच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेता यावा यासाठी तयार करण्यात आलेली अभ्यासक्रम रचना, शिक्षकांच्या विकासासाठी विशेष उपक्रम, तसेच शालेय व उच्च शिक्षणात लवचिकता या धोरणाचे मुख्य वैशिष्ट्ये आहेत.

नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका २०२५
नवोदय प्रवेश परीक्षा सरावा करिता ३५०० + प्रश्न असलेली एकमेव मार्गदर्शिका
याशिवाय, शिक्षण प्रणालीतील डिजिटल क्रांती, मातृभाषेचा वापर, लिंगसंतुलन आणि समावेशक शिक्षण यावर विशेष भर देण्यात आला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (National Education Policy 2020) हे भारताला ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्था बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
या ब्लॉगमधून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (National Education Policy 2020) च्या प्रमुख बाबी, त्याचे उद्दिष्ट, अंमलबजावणी आणि भविष्यातील परिणाम याविषयी सविस्तर (नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 pdf) माहिती दिली जाणार आहे.
Comments 4