दहावी-बारावी प्रमाणपत्र दुरुस्ती | नाव व जन्मतारीख दुरुस्तीसाठी कागदपत्रांची यादी
दहावी-बारावी प्रमाणपत्रातील नाव व जन्मतारीख दुरुस्ती – आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण माहिती
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे विभागीय मंडळाने दहावी (SSC) किंवा बारावी (HSC) च्या प्रमाणपत्रातील नाव किंवा जन्मतारखेतील दुरुस्ती करण्यासाठीचे नियम आणि आवश्यक कागदपत्रांची यादी प्रसिद्ध केली आहे.
ही दुरुस्ती फक्त संबंधित शाळेच्या/कनिष्ठ महाविद्यालयाच्या जनरल रजिस्टरमध्ये नोंद असलेल्या माहितीनुसारच करता येईल.
कोणती दुरुस्ती करता येते?
-
दहावी किंवा बारावीच्या प्रमाणपत्रामधील:
-
नावातील चूक
-
जन्मतारीख चुकीची असल्यास दुरुस्ती
-
आवश्यक कागदपत्रांची यादी
अ. जर तुम्ही 10वी (SSC) च्या प्रमाणपत्रातील दुरुस्ती करत असाल:
-
दहावीचे मूळ प्रमाणपत्र
-
दहावीच्या गुणपत्रिकेची छायांकित प्रती
-
इयत्ता 1 ली ते 10 वी पर्यंतच्या गुणपत्रिका / शाळा सोडल्याचा दाखला
-
प्राथमिक शाळा सोडल्याचा दाखला
-
माध्यमिक शाळा सोडल्याचा दाखला
-
जनरल रजिस्टरची छायांकित प्रत (प्राचार्य/मुख्याध्यापक यांच्या सहीसह)
-
विभागीय शिक्षण उपसंचालक, पुणे यांना सादर केलेले शपथपत्र (Declaration Form No. 1/2)
ब. जर तुम्ही 12वी (HSC) च्या प्रमाणपत्रातील दुरुस्ती करत असाल:
-
बारावीचे मूळ प्रमाणपत्र
-
बारावीच्या गुणपत्रिकेची छायांकित प्रत
-
दहावीचे मूळ प्रमाणपत्र व गुणपत्रिका
-
इ. 1 ली ते 12 वी पर्यंतच्या गुणपत्रिका / शाळा सोडल्याचा दाखला
-
प्राथमिक व माध्यमिक शाळा सोडल्याचे दाखले
-
जनरल रजिस्टरची छायांकित प्रत
-
विभागीय शिक्षण उपसंचालक, पुणे यांना सादर केलेले शपथपत्र (Declaration Form No. 1)
महत्त्वाच्या सूचना:
-
मूळ प्रमाणपत्र / शपथपत्र / दाखले हे मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांनी स्वतः किंवा त्यांच्या प्रतिनिधीद्वारेच सादर करावेत.
-
जनरल रजिस्टरमध्ये योग्य ती नोंद नसल्यास दुरुस्ती मंजूर केली जाणार नाही.
-
चुकीची माहिती दिल्यास, शाळा/महाविद्यालय/विद्यार्थ्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.
-
एकाच अर्जात जन्मतारीख व नाव या दोन्ही दुरुस्त्या करता येणार नाहीत.
-
ही प्रक्रिया विभागीय शिक्षण उपसंचालक, पुणे यांच्या मार्गदर्शनाखालीच पार पाडली जाईल.
शुल्क माहिती (Fee Details):
प्रकार | शुल्क |
---|---|
पहिल्यांदा दुरुस्ती | ₹200/- |
दुसऱ्यांदा दुरुस्ती | ₹300/- |
✅ शाळेच्या किंवा महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी संपर्क साधून योग्य मार्गदर्शन घ्या.