सुरक्षित चेकआउट (₹199)
Maha TET सराव प्रश्नपत्रिका! पेपर 1 Set- 1 To 10
We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.
CBSE च्या १० आणि १२ वीच्या परीक्षा १६ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
या परीक्षांचं वेळापत्रक सीबीएसईनं वेबसाइटवर प्रसिद्ध केलं.
दहावीची परीक्षा ९ मार्चपर्यंत १२ वीची परीक्षा ९ एप्रिलपर्यंत सुरू असेल.
१०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट! यंदाच्या CBSE बोर्ड परीक्षा *१६ फेब्रुवारी २०२७ (मंगळवार)* पासून सुरू होणार आहेत.
सण अग्रिमाची मर्यादा २० हजार रुपये
▪️पात्र अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना २०,००० रुपये सण अग्रिम मिळणार
▪️पात्रता: १ जानेवारी २००६ पासून सुधारित वेतनरचनेनुसार ग्रेड वेतन ४,८०० रुपयांपेक्षा अधिक नसलेले अराजपत्रित कर्मचारी
▪️दिवाळी, रमझान ईद, ख्रिसमस, पारसी नववर्ष, संवत्सरी, रोश-होशना, बुद्ध जयंती, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, डॉ. आंबेडकर जयंती या सणांसाठी लागू राहील
सीएसआयआर-यूजीसी नेट डिसेंबर २०२६ : अर्ज करण्याची मुदत वाढवली!
सीएसआयआर-यूजीसी नेट डिसेंबर २०२६ परीक्षेसाठी विलंब शुल्काशिवाय अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ९ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११ वाजून ५० मिनिटांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
आतापर्यंत एकूण २ लाख २३ हजार ३९५ अर्जांची नोंदणी झाली असून, त्यापैकी १ लाख ७६ हजार ६१६ उमेदवारांनी शुल्क भरलं आहे.
उमेदवारांनी मुदतीपूर्वी शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करून पुष्टीकरण पृष्ठ डाउनलोड करावं. अखेरच्या क्षणी तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी अर्ज प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.