EPFO ने पीएफमधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले असून, निवृत्त सदस्यांना आता Systematic Withdrawal Plan द्वारे मासिक, त्रैमासिक किंवा सहामाही स्वरूपात रक्कम काढता येणार आहे.
पीएफ खात्यातील किमान शिल्लक मर्यादा २५ टक्क्यांवरून १० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली आहे.
तसंच, संपूर्ण पीएफ रक्कम काढण्यासाठीचा प्रतीक्षा कालावधी १२ महिन्यांवरून दोन महिन्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय EPFO च्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
