आंतरजिल्हा बदली प्रक्रिया 2024-25: महत्त्वाचे निर्देश आणि वेळापत्रक
राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांसाठी आंतरजिल्हा बदली प्रक्रिया 2024-25 (Shikshak Badali) साठी सुधारित धोरण जाहीर करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या 23 /05/2023 रोजीच्या निर्णयानुसार ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे.
आंतरजिल्हा बदलीसाठी वेळापत्रक
राज्य सरकारच्या निर्देशांनुसार, आंतरजिल्हा बदलीसाठी खालील प्रमाणे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे:
अ.क्र. | कार्यवाहीचे स्वरूप | कालावधी |
1 | शिक्षकांची माहिती पोर्टलवर अद्ययावत करणे | 10 मार्चपर्यंत |
2 | जिल्हा परिषदांनी बिंदुनामावल्या तपासून घेणे व पोर्टलवर बिंदुनामावल्या व रिक्त पदांची माहिती अपलोड करणे.(यापूर्वी आंतरजिल्हा बदली झालेल्या तथापि, संबंधित जिल्हा परिषदांकडून अद्यापपर्यंत कार्यमुक्त न केलेल्या शिक्षकांची पदे आंतरजिल्हा बदली झालेल्या जिल्हा परिषदेने ऑनलाईन पोर्टलवर रिक्त दाखवू नयेत.) | 11 मार्च ते 13 मार्च |
3 | शिक्षकांना ऑनलाईन पोर्टलवर अर्ज भरण्याची सुविधा देणे | दि. १४ मार्च ते २० मार्च |
4 | अर्जाची पडताळणी करणे. | दि. २१ मार्च ते २५ मार्च |
5 | न्यायालयीन प्रकरणे / विभागीय आयुक्तांकडे अपिल दाखल केलेल्या प्रकरणी बदलीबाबतचे स्पष्ट आदेश असल्यास या प्रकरणी प्रथमतः तपासून प्राधान्य देणे. | दि. २६ मार्च ते २७ मार्च |
6 | आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पुर्ण करणे. | दि. २८ मार्च ते ६ एप्रिल |
महत्त्वाच्या सूचना
आंतरजिल्हा बदली झाल्यानंतर संबंधित जिल्ह्यातील शिक्षण विभागाने त्या शिक्षकांची पदे रिक्त म्हणून दाखवू नयेत.
आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र असलेल्या शिक्षकांनी शासनाच्या 23 जानेवारी 2023 च्या निर्णयानुसार अर्ज भरावा.
ज्या जिल्ह्यांमध्ये सध्याच्या स्थितीत अतिरिक्त शिक्षक आहेत, तिथे नवीन शिक्षकांची पदे उपलब्ध होणार नाहीत.
शिक्षकांसाठी सूचना
जे शिक्षक आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र आहेत, त्यांनी वरील वेळापत्रकानुसार प्रक्रिया पूर्ण करावी.
अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच भरावेत.
बदल्यांमध्ये पारदर्शकता ठेवण्यासाठी शिक्षण विभागाने ऑनलाइन पोर्टलवर सर्व प्रक्रिया उपलब्ध करून दिली आहे.
राज्यभरातील शिक्षकांसाठी ही एक सुवर्णसंधी असून, इच्छुकांनी वेळेत अर्ज भरावा आणि प्रक्रियेनुसार पुढील कार्यवाही करावी.