पहिली विषयनिहाय प्रश्नपेढी
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे (SCERT Maharashtra) यांच्या वतीने इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विषयनिहाय व इयत्तानिहाय प्रश्नपेढी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या प्रश्नपेढीचा उपयोग शिक्षकांना वर्गातील अध्यापन, उजळणी आणि सरावासाठी, तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यासाठी होणार आहे.
या ब्लॉग पोस्टमध्ये आपण इयत्तानिहाय प्रश्नपेढी, विषयानुसार उपलब्ध प्रश्नपेढी आणि संबंधित PDF डाउनलोड लिंक एकाच ठिकाणी देणार आहोत. त्यामुळे शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांना आवश्यक प्रश्नपेढी सहजपणे शोधता येईल.
