6 ते 8 वर्गावर शिकवणाऱ्या शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतनश्रेणी
18 Nov 2026, 03:09 PM6 ते 8 वर्गावर शिकवणाऱ्या शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतनश्रेणी प्रकरण
पदवीधर वेतन श्रेणी लागू करण्याच्या नागपूर उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात महाराष्ट्र शासनाने मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली *SLP – 57397/2026 आज दि.१८ नोव्हेंबर २०२६ रोजी फेटाळण्यात आली आहे.
आता 6 ते 8 वर्गावर शिकवणाऱ्या शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतनश्रेणी मिळण्याच्या मार्ग मोकळा झाला आहे…!
सीईटी अर्थात सामाईक प्रवेश परीक्षा वेळापत्रक जाहीर
16 Nov 2026, 09:08 PMमहाराष्ट्र राज्य सीईटी, अर्थात सामाईक प्रवेश परीक्षा कक्षानं शैक्षणिक वर्ष २०२७-२८ साठी पदवी आणि पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर केलं आहे.
यंदा एकूण २१ सीईटी परीक्षा घेतल्या जाणार असून, त्यापैकी ११ अभ्यासक्रमांसाठी दोन वेळा परीक्षा देण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
















