१०वी व १२वी जुलै-ऑगस्ट २०२५ परीक्षा: खाजगी प्रवेशासाठी अर्ज क्रमांक १७ साठी ऑनलाइन नावनोंदणी सुरू
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांनी दिलेल्या अधिसूचनेनुसार, जुलै-ऑगस्ट २०२५ मध्ये होणाऱ्या १०वी (माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र) आणि १२वी (उच्च माध्यमिक प्रमाणपत्र) परीक्षेसाठी खाजगी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अर्ज क्रमांक १७ साठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहे.
कोण अर्ज करू शकतो?
- ज्या विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी/मार्च २०२५ च्या परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण झाले आहेत (Fail),
- परीक्षेला अनुपस्थित राहिले आहेत (Absent), किंवा पूर्वीच्या वर्षांमध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांनी विषय सुधारणा (Improvement) करायची आहे,
- अशा सर्व विद्यार्थ्यांनी खाजगी प्रवेशासाठी अर्ज क्रमांक १७ सादर करणे आवश्यक आहे.
महत्वाच्या तारखा:
- प्रक्रिया तारीख
- ऑनलाइन अर्ज व शुल्क भरण्याची सुरुवात मंगळवार, १५ एप्रिल २०२५
- अंतिम तारीख गुरुवार, १५ मे २०२५
आवश्यक प्रक्रिया:
- विद्यार्थ्यांनी mahahsscboard.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज क्रमांक १७ साठी ऑनलाइन अर्ज भरावा.
- अर्ज सादर केल्यानंतर त्याचा प्रिंटआउट घ्यावा व त्यावर आवश्यक स्वाक्षऱ्या करून संबंधित शाळा/महाविद्यालयात सादर करावा.
- शाळा/महाविद्यालयांच्या Login द्वारे अर्जाची छाननी होईल आणि Eligible/Non-eligible याचा निर्णय दिला जाईल.
विशेष सूचना:
• अर्ज सादर करताना सर्व आवश्यक कागदपत्रे, फोटो, आणि मागील परीक्षेची माहिती अचूक भरावी.
• अपूर्ण, चुकीचा किंवा उशिरा सादर झालेला अर्ज मान्य केला जाणार नाही.
• विद्यार्थ्यांनी फक्त अर्ज सादर करून न थांबता, शाळा/महाविद्यालयात संपर्क साधून प्रक्रिया पूर्ण झाली की नाही याची खात्री करावी.