क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सत्र 2024-25 – ऑनलाईन अर्ज सुरू!
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयातर्फे शिक्षण व समाजाच्या सर्वांगीण विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यासाठी दरवर्षी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान केला जातो. सत्र 2024-25 साठी अर्ज प्रक्रिया आता ऑनलाईन पद्धतीने सुरू झाली असून, यासाठी वेळापत्रक आणि अर्ज करण्याची लिंक जाहीर करण्यात आली आहे.
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराचे सुधारित निकष जाहीर
महत्वाच्या तारखा – वेळापत्रक (2024-25)
अनुक्रमांक | दिनांक | बाब |
1 | 17/07/2025 | प्रसिध्दी करणे |
2 | 18/07/2025 ते 31/07/2025 | ऑनलाईन नोंदणी कालावधी |
3 | 01/08/2025 ते 03/08/2025 | संचालनालय स्तरावरील काम |
4 | 04/08/2025 ते 07/08/2025 | जिल्हास्तरावरील प्रत्येक्ष शाळा भेट |
5 | 08/08/2025 ते 14/08/2025 | जिल्हास्तरावरील मुलाखत/ पडताळणी व संचालकांकडे सादर करणे |
6 | 16/08/2025 ते 21/08/2025 | राज्यस्तरावरील मुलाखत/ पडताळणी |
7 | 22/08/2025 ते 24/08/2025 | संचालकस्तरावरील काम पूर्ण करणे |
8 | 25/08/2025 | राज्य निवड समिती अंतिम बैठक |
9 | 28/08/2025 | अंतिम निवड यादी शासनास सादर करणे |
10 | 01/09/2025 | शासन निर्णय निर्मिती |
11 | 05/09/2025 | शिक्षक पुरस्कार समारंभ |
अर्ज करण्यासाठी लिंक:
👇 खालील Google Form लिंकवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा:
✅ अर्ज सुरू: 18 जुलै 2025 सकाळी 10:00 वाजता
🛑 शेवटची तारीख: 31 जुलै 2025 सायंकाळी 4:00 वाजेपर्यंत
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार शासन निर्णय GR 16.07.2025
🗒️ अर्ज करताना लक्षात घ्या:
- अर्ज पूर्णपणे ऑनलाइन स्वरूपात भरावा लागेल.
- कोणत्याही प्रकारचा ऑफलाइन अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- शाळा/ संस्था प्रमुखांनी पात्र शिक्षकांची माहिती वेळेत पोहोचवावी.
🎯 पुरस्काराचे उद्दिष्ट:
राज्यातील गुणवत्तापूर्ण, प्रेरणादायी आणि कर्तव्यदक्ष शिक्षकांना प्रोत्साहन देऊन, इतर शिक्षकांसाठी आदर्श निर्माण करणे हा पुरस्काराचा मुख्य हेतू आहे.
👉 तुम्ही पात्र असाल किंवा तुमच्या शाळेतील शिक्षक पात्र असतील, तर ही एक सुवर्णसंधी आहे! वेळेत अर्ज करा आणि गुणवत्तेचा गौरव अनुभवा.
अधिक माहितीसाठी संपर्क करा:
📧 Email: doesecondary1@gmail.com
📞 दूरध्वनी क्रमांक: 020-25672914
जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली, तर नक्की शेअर करा!
#TeacherAward #MaharashtraEducation #ShikshakPuraskar #SavitribaiPhule #KrantiJyotiAward #शिक्षकगौरव
Comments 1