क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराचे सुधारित निकष जाहीर
शिक्षण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळेच समाज व राष्ट्राचा विकास होतो. अशा समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविले जाते. राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे प्रस्ताव पात्र शिक्षकांकडून शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कडून ऑनलाईन मागविण्यात येतात. अस्तित्वात असलेल्या मार्गदर्शक सूचना /निकषांनुसार जिल्हास्तरावर जिल्हा निवड समिती प्रस्तावांची छाननी करून प्रवर्गनिहाय पात्र प्रस्ताव शिक्षण संचालक स्तरावर गठीत करण्यात आलेल्या राज्य निवड समितीकडे पाठवतात. सदर शिफारशींवर शिक्षकांच्या गुणवत्तेनुसार अंतिम निवड करून राज्य निवड समितीकडून शासनाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यात येतात. सदर राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार उपरोक्त शासन निर्णयांनुसार प्रदान करण्यात येतात. कालानुरूप त्यामध्ये बदल करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सत्र 2024-25 – ऑनलाईन अर्ज सुरू!
शासन निर्णय :-
सदर राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार सर्वसाधारणपणे १५ ऑगस्ट रोजी जाहीर करून त्याचे प्रत्यक्ष वितरण ५ सप्टेंबर या शिक्षकदिनी दिनांक ४ सप्टेंबर, २०१४ अन्वये राष्ट्रीय/ राज्य पुरस्कार मिळणाऱ्या शिक्षकांना देण्यात येणाऱ्या दोन जादा वेतन वाढीऐवजी रु.१,००,०००/- इतकी ठोक रक्कम देण्यात येईल. तसेच शासन निर्णय दिनांक २८ डिसेंबर, २०१३ अन्वये पुरस्कार प्राप्त शिक्षकांना रु. १०,०००/- रोख बक्षीस,स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देवून सन्माननीय व्यक्तींच्या हस्ते प्रदान करण्यात येतात.
सदर पुरस्कारासाठी होणारा वाढीव खर्च (बक्षिसाची रक्कम व समारंभाचा इतर खर्च) मागणी क्र. इ- २, २२०२ सर्व साधारण शिक्षण ८०, सर्व साधारण, ८०० इतर खर्च (०२) संकीर्ण (०२) (०१) आदर्श शिक्षकांना पुरस्कार, ३४ शिष्यवृत्त्या/विद्यावेतने (२२०२ २२९२) या लेखाशीर्षाखाली मंजूर तरतुदीमधून भागविण्यात येतात.
राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराबाबतचे निकष सुधारित करून सदर योजना ‘क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार ‘या नावाने राबविण्यात शासन मान्यता देण्यात आली आहे.‘क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार’ साठी अटी व निकष पुढीलप्रमाणे :-
‘क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार’ प्रस्तावासाठी आवश्यक अटी :-
१) शिक्षकांनी नामनिर्देशासाठी सादर केलेले पुरावे मुख्याध्यापकांनी प्रमाणित करणे आवश्यक.
२) मुख्याध्यापक पदावरील व्यक्तीने नामनिर्देशनासाठी सादर केलेले पुरावे गटशिक्षणाधिकारी प्रशासन अधिकारी यांनी प्रमाणित करणे आवश्यक.
३) शिक्षक/मुख्याध्यापकाची एकूण सलग सेवा किमान १० वर्षे आवश्यक.
४) शिक्षकाचे / मुख्याध्यापकाचे मागील पाच वर्षाचे गोपनीय अहवाल.
५) विभागीय चौकशी सुरु नसल्याचे शिक्षणाधिकारी यांचे प्रमाणपत्र.
६) शिक्षकांनी केलेल्या लगतच्या ५ वर्षाच्या सेवा कालावधीतील कार्याचे मूल्यमापन राज्यस्तर व जिल्हास्तर समितीकडून गुणांकनाव्दारे करण्यात येईल.
७) प्रतिनियुक्तीवरील शिक्षकांची आवेदने स्वीकारली जाणार नाहीत.
८) शिक्षकाच्या सेवेतील कार्यपध्दतीबाबत व निर्व्यसनी असलेबाबत शाळा व्यवस्थापन समितीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
९) एकदा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर पुन्हा याच पुरस्कारासाठी पात्र असणार नाही.
१०) एक शिक्षक कोणत्याही एकाच प्रवर्गासाठी अर्ज करण्यास पात्र असले. एकापेक्षा जास्त सवंर्गात अर्ज केल्यास त्यांचे अर्ज निवड प्रक्रियेतून रद्द केला जाईल.
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराचे सुधारित निकष जाहीर -शासन निर्णय
Comments 1