सेतू अभ्यास २०२६-२७: ३ री, ४ थी, ६ वी साठी नवीन अपडेट
महाराष्ट्र राज्य सेतू अभ्यास २०२६-२७ (Setu Abhyas 2026-27): इयत्ता ३री, ४थी व ६वी साठी SCERT चे नवीन अपडेट महाराष्ट्र शासनाच्या ...
We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) आपले कार्यालय नवीन ठिकाणी हलवले आहे.
सर्व उमेदवार, विद्यार्थी, शैक्षणिक संस्था, संबंधित घटक, सेवा पुरवठादार आणि सामान्य जनतेला विनंती आहे की, त्यांनी कार्यालयाच्या नवीन पत्त्याची नोंद घ्यावी आणि त्यानुसार आपल्याकडील माहिती अद्ययावत करावी.
📍 नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)
५ वा मजला, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया प्रेस बिल्डिंग
मिंटो रोड, नवी दिल्ली ११० ००२
प्राध्यापक भरतीसाठी आवश्यक असलेली सेट म्हणजे महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा आता २५ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
#MaharashtraSET #SETExam #EducationNews #PuneUniversity #ExamUpdate
📢 CTET 2026 परीक्षेची अधिकृत घोषणा! 🎓
📝 CTET ची 22 वी आवृत्ती
📅 12 व 13 डिसेंबर 2026 रोजी परीक्षा होणार.
📍 परीक्षा शहर व तारीख परीक्षेच्या 15 दिवस आधी CTET पोर्टलवर उपलब्ध होईल.
🎫 Admit Card परीक्षेच्या 2 दिवस आधी डाउनलोड करता येईल.
#CTET2026 #CTETExam #TeacherEligibilityTest #CBSE
शालेय रेकॉर्डमधील चूक दुरुस्त करता येणार!
विद्यार्थी शाळा सोडल्यानंतरही शालेय रेकॉर्डमध्ये नजरचुकीने किंवा अनवधानाने झालेली चूक दुरुस्त करता येईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या पूर्णपीठाने दिला आहे.
📌 विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा!
ST Scholarship 2026-27: महाडीबीटीवर शिष्यवृत्ती अर्ज सुरू!
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती 2026-27 चे नवीन व नूतनीकरण अर्ज सुरू. पात्रता, कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या.
परीक्षा प्रक्रियेत स्थैर्य, सुरक्षितता आणि पारदर्शकतेला प्राधान्य
उच्चस्तरीय भरती परीक्षा टास्क फोर्सची सल्लामसलत; राज्यातून १८ हजारांहून अधिक ई-मेल्स प्राप्त
महाराष्ट्र लोकसेवा आयोगासह विविध स्पर्धा परीक्षांची प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित, स्थिर आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी राज्य शासनाने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय भरती परीक्षा टास्क फोर्सच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालक आणि अन्य संबंधितांशी सल्लामसलत करण्यात आली.
🚨 महाराष्ट्र SET परीक्षा 2026 बाबत महत्त्वाची अपडेट!
📢 27 सप्टेंबर 2026 रोजी होणारी महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) पुढे ढकलण्यात आली आहे.
📅 नवीन परीक्षा तारीख: 25 ऑक्टोबर 2026
केंद्रीय लोकसेवा आयोग व इतर स्पर्धा परीक्षांच्या वेळापत्रकासह 25 सप्टेंबरच्या अनंत चतुर्दशीमुळे विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.
📌 संबंधित परीक्षार्थींनी नवीन तारखेची नोंद घ्यावी.
#MHSET2026 #SETExam #SET2026 #MaharashtraSET #ExamUpdate #परीक्षाअपडेट
भरती परीक्षा सुधारणा उच्चस्तरीय टास्क फोर्सचा १२ सप्टेंबरपासून राज्यव्यापी संवाद.
३० सप्टेंबरपर्यंत सहा विभागांना भेट देणार. विद्यार्थी, उमेदवार, संबंधित घटकांशी थेट संवाद साधणार.
राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC) मध्ये 8 वी प्रवेश
RIMC प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी सुरू झाली आहे. पात्र उमेदवार १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.
🎓 GATE 2027 साठी अर्ज प्रक्रिया सुरू!
‘ग्रेजुएट एप्टीट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग’ (GATE) 2027 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 27 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाली आहे. यावर्षी परीक्षेचे आयोजन IIT मद्रासकडून करण्यात येणार आहे.
📌 महत्त्वाच्या तारखा
▪️ अर्जाची अंतिम तारीख: 27 सप्टेंबर 2026
▪️ लेट फीसह अर्ज: 5 ऑक्टोबर 2026
▪️ अर्ज दुरुस्ती: 14 ते 21 ऑक्टोबर 2026
▪️ परीक्षा: 6, 7, 13, 14, 20 व 21 फेब्रुवारी 2027
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.