माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापक व शिक्षकांकरिता सुट्टीतील कामकाजाबाबत महत्त्वाची माहिती
28 एप्रिल 2025 रोजी शिक्षण संचालनालय, माध्यमिक व उच्च माध्यमिक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी एक महत्त्वाचे परिपत्रक जाहीर केले आहे. यामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापक, लिपिक व इतर शिक्षकांच्या सुट्टीतील कामकाजाबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
कामकाजाबाबत महत्त्वाच्या सूचना
राज्य शासनाच्या मूल्यमापन व प्रशासन विषयक निर्देशानुसार, खालील प्रकारचे कामकाज सुटीच्या कालावधीत शाळा कार्यालयात उपस्थित राहून करणे अनिवार्य आहे –
1. १२ वी बोर्ड परीक्षेचे कामकाज
2. १० वी बोर्ड परीक्षेचे कामकाज
3. स्कूल मॅपिंगचे कामकाज
4. संचालनालय व इतर अनुशंगिक महत्त्वाचे कामकाज
जबाबदाऱ्या
• मुख्याध्यापक, लिपिक व इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी दिलेल्या कामकाजासाठी शाळेत नियमितपणे उपस्थित राहून काम पूर्ण करणे आवश्यक आहे.
• विभागीय शिक्षण उपसंचालकांनी आपल्या अधिपत्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना याबाबत तात्काळ सूचना द्याव्यात व कामकाजाची योग्य अंमलबजावणी व्हावी याची दक्षता घ्यावी.
राज्य शासनाने शाळांतील शिक्षण व प्रशासनाच्या नियमिततेसाठी सुटीच्या काळातही काही महत्त्वाची कामे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्व संबंधितांनी जबाबदारीने व नियोजनबद्ध पद्धतीने या कामकाजात सहभाग घ्यावा.
Comments 1