इयत्ता ११ वी (FYJC) केंद्रीय प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ — संपूर्ण मार्गदर्शक
📝 महाराष्ट्र अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू
२०२५-२६ शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र राज्यात इ.११ वी प्रवेश प्रक्रिया आता संपूर्णपणे ऑनलाइन आणि केंद्रीय स्वरूपात पार पडणार आहे. २१ मेपासून ही FYJC Admission 2025 प्रक्रिया सुरू झाली असून राज्यभरातील ९,२९४ कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी केली आहे.
इयत्ता अकरावी प्रवेशासाठी गुणवत्तेनुसार दुसरी प्रवेश यादी
📢 महत्त्वाची सूचना – इयत्ता ११ वी प्रवेशासाठी मुदतवाढ
प्रशिक्षण संचालक (माध्यमिक) डॉ. श्रीराम पानझाडे यांनी कळविल्यानुसार, इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ अंतर्गत विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी ५ जून २०२५ रोजी दुपारी २.०० वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
ही मुदतवाढ ३१ मे २०२५ रोजी शासनाने दिलेल्या पत्रानुसार इन-हाऊस कोट्यातील जागा भरण्यासाठी आवश्यक बदल करण्यात आले असल्यामुळे दिली गेली आहे.
📝 ज्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांनी लवकरात लवकर आपली नोंदणी पूर्ण करावी.
⏰ अंतिम मुदत: ५ जून २०२५ – दुपारी २.०० वाजेपर्यंत
🖥️ प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची तारीख
विद्यार्थ्यांना २१ ते २९ मे २०२५ या कालावधीत mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज सादर करता येईल.
प्रत्येक विद्यार्थ्याला किमान एक आणि कमाल दहा प्राधान्यक्रम निवडता येणार आहेत.
नोंदणी शुल्क फक्त ₹१००/- ठेवण्यात आले आहे.
Official website 11th admission link
📋 महत्वाच्या तारखा आणि वेळापत्रक
टप्पा | तारीख |
---|---|
सराव अर्ज भरणे | १९ आणि २० मे २०२५ |
प्रत्यक्ष ऑनलाइन अर्ज | २१ ते २९ मे २०२५ |
तात्पुरती गुणवत्ता यादी | ३० मे २०२५ |
हरकती नोंदवण्याची शेवटची तारीख | १ जून २०२५ |
अंतिम गुणवत्ता यादी | ३ जून २०२५ |
प्रवेश कालावधी (पहिली फेरी) | ६ ते १२ जून २०२५ |
राखीव जागांसाठी प्रवेश | ३ जूनपासून पुढे |

🧾 प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे
अर्ज भरण्यापूर्वी खालील कागदपत्रांची तयारी ठेवा:
-
दहावीचा गुणपत्रक (Original Marksheet)
-
शाळा सोडल्याचा दाखला
-
जातीचा दाखला (लागू असल्यास)
-
नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र
-
EWS प्रमाणपत्र
-
दिव्यांग प्रमाणपत्र
-
प्रकल्प/भूकंपग्रस्त प्रमाणपत्र
-
आजी/माजी सैनिक पाल्य दाखला
-
खेळाडू विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र
-
अनाथ विद्यार्थी प्रमाणपत्र
-
परदेशी विद्यार्थ्यांसाठी Indian Embassy दाखले
-
बदली आदेश व सामील होण्याचे पत्र
📡 प्रवेश प्रक्रियेतील नवीन वैशिष्ट्ये
-
यंदा प्रथमच संपूर्ण राज्यासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रणाली लागू करण्यात आली आहे.
-
प्रवेश शुल्काची रक्कम फक्त ऑनलाइनच स्वीकारली जाणार आहे.
-
विद्यार्थ्यांना अर्ज सादर करताना अल्पसंख्याक, व्यवस्थापन कोटा व राखीव जागांसाठीही अर्ज करता येणार आहे.
💡 अर्ज भरण्यापूर्वी लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे
-
ऑनलाइन अर्ज सादर करताना सर्व माहिती अचूक भरावी.
-
प्राधान्यक्रम नीट विचार करून निवडावेत.
-
सर्व आवश्यक कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी तयार ठेवावी.
-
तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी अर्ज वेळीच सादर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
🔗 FYJC Admission साठी अधिकृत संकेतस्थळ
