बारावी बोर्ड परीक्षा अर्ज भरण्याची मुदतवाढ – ऑक्टोबर 2025 पर्यंत संधी
📢 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या फेब्रु-मार्च 2026 च्या बारावी बोर्ड परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख (नियमित शुल्कासह) 20 ऑक्टोबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
राज्यातील अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यात अडचणी येत असल्याचे लक्षात घेऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी हा निर्णय घेतला. राज्य मंडळाने कळविल्यानुसार मुदतवाढीमुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नियमित विद्यार्थ्यांसाठी अर्ज प्रक्रिया
✔ नियमित विद्यार्थ्यांनी आपले अर्ज UDISE + माध्यमिक PEN-ID वापरून ऑनलाइन पद्धतीने त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखामार्फत भरावेत.
✔ व्यावसाय अभ्यासक्रम घेणारे विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नवनियुक्त प्रमाणपत्र प्राप्त विद्यार्थी, खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजना, तुर्तूक विषय व आयटीआय (Transfer of Credit घेणारे) विद्यार्थी यांनाही अर्ज भरता येतील.
✔ सर्व विद्यार्थ्यांनी अर्ज www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावेत.
दहावी व बारावी खासगी विद्यार्थ्यांसाठी
📌 फेब्रु-मार्च 2026 मधील दहावी व बारावी परीक्षेसाठी खासगी विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज (फॉर्म नं. 17) सादर करण्याची अंतिम तारीख १५ ऑक्टोबर 2025 पर्यंत वाढवली आहे.
परीक्षा केंद्रासाठी प्रस्ताव
🔹 दहावी व बारावी परीक्षेसाठी नवीन परीक्षा केंद्र मान्यतेचे प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत १० ऑक्टोबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
महत्वाचे दुवे
👉 अर्ज भरण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ: www.mahahsscboard.in
बारावी तसेच दहावीचे नियमित आणि खासगी विद्यार्थी यांनी ही वाढीव मुदत लक्षात घेऊन आपले अर्ज वेळेत पूर्ण करावेत. विशेषतः अतिवृष्टीमुळे अर्ज प्रक्रियेत उशीर झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी आहे.





















