आयडॉल शिक्षक एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा – थेट प्रक्षेपण
Idol Teacher One-Day State Level Workshop – Live Broadcast : शिक्षण क्षेत्रात सातत्याने नवनवीन बदल होत आहेत आणि या बदलांशी जुळवून घेत, विद्यार्थ्यांना सर्वोत्तम ज्ञान देणे हे प्रत्येक शिक्षकाचे ध्येय असते. याच उद्देशाने, राज्यातील कल्पक आणि उपक्रमशील शिक्षकांसाठी ‘आयडॉल शिक्षक एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील तापडिया नाट्यमंदिर येथे होणाऱ्या या भव्य कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा. ना. श्री. दादाजी भुसे आणि राज्यमंत्री मा. ना. श्री. पंकज भोयर यांच्या शुभहस्ते दिनांक ४ डिसेंबर २०२५ रोजी संपन्न होणार आहे. तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक शिक्षकाला या ज्ञानयज्ञाचा लाभ घेता यावा, यासाठी या संपूर्ण कार्यक्रमाचे YouTube Live प्रक्षेपण केले जाणार आहे. चला तर मग, जाणून घेऊया या कार्यशाळेचे स्वरूप आणि त्यामध्ये सहभागी कसे होता येईल…
















