११ वी प्रवेशासाठी नोंदणीला सुरुवात – आता एकाच अर्जावर राज्यभर प्रवेश
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी ११ वीच्या प्रवेश प्रक्रियेची सुरुवात १९ मे २०२५ पासून झाली आहे. यंदा सर्व विद्यार्थ्यांसाठी https://mahafyjcadmissions.in/ या संकेतस्थळावरून एकाच अर्जावर राज्यभरातील कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
इ.10 वीचा निकाल 2025 जाहीर! (SSC Result 2025 Maharashtra)
महत्त्वाचे बदल आणि वैशिष्ट्ये:
-
यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत राज्यभर एकाच संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करता येणार.
-
प्रवेश प्रक्रिया संपूर्णपणे पारदर्शक व संगणकीकृत.
-
ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना समान सुविधा.
-
प्रत्येक जिल्ह्यातील महाविद्यालयांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध.
प्रवेशासाठी आवश्यक टप्पे:
-
https://mahafyjcadmissions.in/ या संकेतस्थळावर लॉगिन करणे.
-
नवीन खाते तयार करून आवश्यक माहिती भरून ऑनलाइन फॉर्म सबमिट करणे.
-
शाळेतून प्रमाणित कागदपत्रे अपलोड करणे.
-
महाविद्यालयांच्या पसंतीक्रमानुसार पर्याय निवडणे.
-
निकालानंतर कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित करणे.
नोंदणीची अंतिम तारीख व प्रक्रिया:
-
प्रत्येक महाविद्यालयाला गुरुवारपर्यंत त्यांच्याकडील जागांची माहिती अद्ययावत करावी लागणार आहे.
-
विद्यार्थी त्यांच्या पसंतीच्या कॉलेजसाठी फॉर्म भरून पुढील प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
-
प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असल्याने कोणत्याही ठिकाणावरून ही प्रक्रिया करता येणार.
शासनाची महत्त्वाची सूचना:
“शहरी आणि ग्रामीण असे सर्व ठिकाणी ऑनलाईन ११ वी प्रवेश प्रक्रिया एकाच पद्धतीने होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना पारदर्शक पद्धतीने प्रवेश घेता येईल.”
— डॉ. भास्करराव बव्हाणे, शिक्षण उपसंचालक
11th Admission 2025 Maharashtra, 11th Online Admission Form, mahafcyadmissions.in registration, FYJC Admission 2025-26, 11 वी प्रवेश अर्ज, महाराष्ट्र ११ वी ऑनलाईन प्रवेश, fyjc online admission process