TAIT Exam 2025 ; शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२५
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या तसेच महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागांच्या शाळांमध्ये ‘पवित्र’ या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीकरिता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२५’ या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहे.
सन २०१८ व २०१९ च्या टीईटी गैरप्रकारात समाविष्ट असलेल्या उमेदवारांची यादी www.mscepune.in ‘या संकेतस्थळावर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१८ व २०१९ गैरप्रकारामध्ये समाविष्ट उमेदवारांची संपादणूक रद्द करणे व शास्ती करणेबाबतची यादी’ या सदरात (Tab) वर प्रसिद्ध केलेली आहे. प्रत्येक उमेदवाराने संबंधित यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही ? याबाबत खात्री करून वस्तुनिष्ठ माहिती आवेदनपत्रा मध्ये भरावी, आपण भरलेली माहिती चुकीची असल्याचे निदर्शनास आल्यास कोणत्याही स्तरावर आपली संपादणूक रद्द करण्याचा अधिकार परीक्षा परिषदेकडे राहील तसेच २०१८ व २०१९ च्या गैरप्रकाराच्या यादी मध्ये आपले नाव समाविष्ट असून सुद्धा खोटी व चुकीची माहिती भरून परीक्षेस प्रविष्ट झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.
उपलब्ध पदसंख्या : राज्यातील शिक्षण सेवकांच्या / शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती, विषय, प्रवर्ग, माध्यम व व बिंदुनामावली नुसार ‘पवित्र’ (PAVITRA- Portal For Visible To All Teacher Recruitment) या संगणकीय प्रणालीद्वारे प्रसिद्ध करण्यात येईल.
परीक्षेचे माध्यम व अभ्यासक्रम
Maha TAIT परीक्षा अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप
उमेदवारांची पात्रता –
उमेदवार भारतीय नागरिक असावा.
वयोमर्यादेबाबत किमान वयोमर्यादा १८ वर्षे व शासन वेळोवेळी शासन निर्णयाद्वारे विहित करील, अशी वयोमर्यादा शिक्षण सेवकांना/ शिक्षकांना लागू होईल.
शैक्षणिक, व्यावसायिक व इतर अर्हताः
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. संकिर्ण २०१८ / प्र.क्र. ३९७ / टीएनटी-१, दि. ०७ फेब्रुवारी २०१९, शासन शुद्धिपत्रक क्र. संकिर्ण-२०१८/प्र.क्र.३९७/टिएनटी- १, दि. २५ फेब्रुवारी २०१९, शासन शुद्धिपत्रक क्र. संकिर्ण-२०१८ / प्र.क्र. ३९७ / टीएनटी-१, दि. १६ मे २०१९, शासन शुद्धिपत्रक क्र. संकिर्ण-२०१८/प्र.क्र.३९७/टिएनटी-१, दि. १२ जून २०१९ तसेच शासनाचे वेळोवेळीच्या आदेशानुसार अर्हताप्राप्त उमेदवार सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र असतील.शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्र. एसएसएन २०१५/(प्र.क्र.१६/१५)/टिएनटी-२, दि. १५ मार्च २०२४ अन्वये संच मान्यतेच्या सुधारित निकषान्वये विशेष शिक्षक माध्यमिक शाळा या पदांचा देखील पदभरतीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे.शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्र. संकिर्ण-२०२२/प्र.क्र.१०६ / टीएनटी-१, दि १० नोव्हेंबर २०२२ मधील मुद्दा क्र. ३ (२) अन्वये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेसाठी प्रविष्ट होण्यासाठी उमेदवारास किमान शैक्षणिक व व्यावसायीक अर्हता धारण करणे अनिवार्य असेल.तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्र. संकिर्ण-२०२३/प्र.क्र.५०९/टिएनटी-१, दि १३ ऑक्टोंबर २०२३ मधील मुद्दा क्र. ३ अनुसार उच्च माध्यमिक (इ. ११ वी ते १२ वी) या विभागाकडील दोन विषयांचा मान्य कार्यभार विचारत घेऊन पूर्णवेळ मान्य रिक्त पदांवर नियुक्ती करण्यासाठी दोन्ही विषयांत पदव्युत्तर पदवीची मूळ अर्हता संबंधित माध्यमातून धारण करणारे उमेदवार नियुक्तीस पात्र असतील. तसेच मुद्दा क्र. ४ अन्वये उच्च माध्यमिक (इ. ११ वी ते १२ वी) या गटातील संचमान्यतेत मूळ मंजूर पदांपैकी रिक्त असलेली अर्धवेळ पदांची ( तासिका तत्त्वावरील वगळून) भरती करण्यात येईल. प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास संबंधित शैक्षणिक व व्यावसायिक अनुषंगिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. संकिर्ण- २०२२/प्र.क्र.१०६/टीएनटी-०१, दि.१०/११/२०२२ अनुसार उमेदवारास प्रत्येक वेळी नव्याने होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होणे अनिवार्य राहील. उमेदवाराचे त्यापूर्वीच्या चाचणीतील गुण नवीन चाचणीचा अंतिम निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर नव्याने येणाऱ्या जाहिरातीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत.अराखीव (खुला) उमेदवारांकरिता विहित केलेली वयोमर्यादा तसेच शैक्षणिक / व्यावसायिक व इतर पात्रता विषयक निकषासंदर्भातील अटींची पूर्तता करणाऱ्या सर्व उमेदवारांचा (मागासवर्गीय उमेदवारांसह) अराखीव (खुला) सर्वसाधारण पदावरील शिफारशीं करिता विचार होईल.चारित्र्य – पूर्वचारित्र्य पडताळणीअंती आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास संबंधित उमेदवार नियुक्तीसाठी / सेवेसाठी पात्र राहणार नाहीत. तसेच असे उमेदवार कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरतील.
ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत :
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पुरविण्यात आलेल्या https://ibpsonline.ibps.in/mscepmar25/ या लिंकव्दारे विहित पद्धतीने नोंदणी करून आपला ऑनलाईन अर्ज सादरकरणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराच्या नावाची नोंद करताना ती आधार कार्डामधील नोंदीप्रमाणे असणे आवश्यक आहे. परीक्षेच्या वेळी/निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर ओळखपत्र म्हणून सदर आधारकार्ड दाखवणे अनिवार्य आहे. ऑनलाईन अर्जामधील नावात व आधारकार्डा मधील नावाच्या नोंदीमध्ये कोणतीही तफावत आढळल्यास आपली उमेदवारी रद्द होईल.उमेदवाराने अर्जामध्ये त्याचा मोबाईल क्रमांक व पर्यायी मोबाईल क्रमांक तसेच ईमेल आयडी नमूद करणे आवश्यक आहे. याच मोबाईल क्रमांकावर व ईमेल आयडीवर या कार्यालयाकडून वेळोवेळी आपल्याशी संपर्क साधला जाणार आहे. त्यामुळे सदर मोबईल क्रमांक व ईमेल आयडी नियुक्तीची प्रक्रिया होईपर्यंत कार्यरत राहील याची दक्षता घेणे आवश्यक आहे.परीक्षा शुल्काचा भरणा विहित पद्धतीने करणे आवश्यक आहे.ऑनलाईन अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
परीक्षेचे शुल्क :
१. खुल्या संवर्गातील उमेदवार (अराखीव): रु. ९५०/-
२. मागासवर्गीय/ आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक/ सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग / अनाथ / दिव्यांग उमेदवार: रु.८५०/-
३. परीक्षा शुल्क ना परतावा (Non-refundable) आहे.
४. उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील.
५. विहित मुदतीत परीक्षा शुल्काचा भरणा करु न शकलेल्या अथवा अपूर्ण शुल्क भरलेल्या उमेदवारांचा संबंधित परीक्षेसाठी विचार केला जाणार नाही.
Comments 1