– संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक २ ची प्रश्नपत्रिका प्रसारित केल्याबद्दल कठोर कारवाई
पुणे, 7 एप्रिल 2025: राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र (SCERT) तर्फे घेण्यात येणाऱ्या संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक २ ची प्रश्नपत्रिका ही आज काही यूट्यूब चॅनल्सवर प्रसारित झाल्याचे निदर्शनास येताच, संबंधित चॅनल्सवर आणि माहिती पुरविणाऱ्यांवर एफ. आय. आर. दाखल करण्यात आली आहे.
या प्रश्नपत्रिकेच्या प्रसारणामुळे चाचणीच्या गोपनीयतेचा भंग झाल्याचे स्पष्ट झाले असून, विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी तात्काळ कठोर पावले उचलण्यात आली आहेत. यासंदर्भात खालील यूट्यूब चॅनल्सवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे:
स्कॉलरशिप स्टडी, ट्विटर एडियम,नॉलेज-गंगा, अनिकेत, ए ए क्लासेस, प्रशांत वारे आर्ट्स, झेन झेड लर्निंग बाय एम _आर, एच टी स्टडी 2.0 , लर्न विथ अनु 21, @सेमी मराठी क्लास, भाषण मित्रा, आर डी क्लब, एस बी सुरज क्रिएशन, एम एच एज्युकेशन,वाय सी एज्युकेशन महाराष्ट्र, Shivstusti रायटिंग, मी गुरुजी,एम एच स्टडी, स्टडी टाईम, स्टडी पार्टनर
संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, प्रश्नपत्रिकेचा स्रोत व त्यामागील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी यंत्रणा सक्रिय झाली आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अशा गोपनीय माहितीची सुरक्षिता ठेवणे अत्यावश्यक असून, अशा प्रकारांवर शून्य सहिष्णुता धोरण राबवण्यात येणार असल्याचे संचालक श्री. राहूल रेखावार यांनी स्पष्ट केले आहे.
सूत्र: राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे.

नवोदय मार्गदर्शिका 2026
वैशिष्ट्ये:
• 1. नवीनतम अभ्यासक्रमानुसार सर्व विषयांचा समावेश.
• 2. मानसिक क्षमतेच्या 1500 प्रश्नांचा समावेश.
• 3. गणिताच्या 1500+ प्रश्नांचा समावेश.
• 4. भाषा चाचणीसाठी 100 परिच्छेद आणि त्यावर आधारित 500 प्रश्न.
• 5. अनुभवी तज्ञांनी तयार केलेले आणि पुनरावलोकन केलेले अभ्यास साहित्य.
• 6. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश.
• 7. 2025 च्या फेज-I आणि II च्या सोडवलेल्या प्रश्नपत्रिका.
• 8. नवोदय परीक्षेनुसार नमुना प्रश्नपत्रिका (OMR शीटसह)