ऑनलाईन वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण नावनोंदणी
शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील वरिष्ठ निवड श्रेणी प्रशिक्षण नावनोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी वेळेत नोंदणी करून घ्यावी. ही नोंदणी Senior Selection Category Training Registration अंतर्गत येते. यामध्ये वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीसाठी स्वतंत्र निकष व अर्हता ठरवण्यात आली आहे. खाली दिलेली माहिती नोंदणीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
ऑनलाईन वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण नावनोंदणीमधील दुरुस्ती – संपूर्ण मार्गदर्शक
वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी यासंबंधी ऑनलाईन प्रशिक्षणासाठी नोंदणी प्रक्रिया २१ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजेपासून सुरु करण्यात आली आहे. ही नोंदणी प्रक्रिया ०६ मे २०२५ रोजी सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत खुली राहणार होती. मात्र, नोंदणी दरम्यान काही प्रशिक्षणार्थ्यांकडून प्रशिक्षण प्रकार व गट निवडीत चुका झाल्याचे निदर्शनास आले. यासाठीच ७ मे २०२५ ते ८ मे २०२५ दरम्यान सुधारणा करण्याची अंतिम संधी प्रदान करण्यात आली आहे.
दुरुस्ती प्रक्रिया का महत्त्वाची आहे?
प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या वरिष्ठ वेतनश्रेणी अथवा निवड वेतनश्रेणीसाठी अचूक माहिती नोंदवणे अत्यंत आवश्यक आहे. चुकीची माहिती पुढील प्रक्रिया अडवू शकते तसेच आपली पात्रता गमावण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे केवळ ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी चुकीच्या गटात किंवा प्रकारात नोंदणी केली आहे, त्यांनीच ही संधी वापरून आपली माहिती अचूक करावी.
दुरुस्ती करण्याचा कालावधी व वेळ
✅ प्रारंभ दिनांक: ७ मे २०२५ सकाळी ११:०० वाजता
✅ शेवटचा दिनांक: ८ मे २०२५ सायं. ६:०० वाजेपर्यंत
हा कालावधी अंतिम आहे, त्यानंतर कोणतीही दुरुस्ती मान्य केली जाणार नाही.
ज्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी दुरुस्ती लागू आहे
फक्त खालील प्रकारच्या चुका केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांनाच दुरुस्ती करण्याची परवानगी आहे:
१. शालार्थ / आश्रम शालार्थ / BMC स्टाफ आयडी असलेले प्रशिक्षणार्थी:
-
शाळेचे नाव देवनागरी लिपीत नोंदविणे.
-
निवड वेतनश्रेणीसाठी पात्र असूनही वरिष्ठ वेतनश्रेणीत नोंदणी केलेली असल्यास – प्रशिक्षण प्रकार दुरुस्ती.
-
प्रशिक्षण गट (प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक/अध्यापक विद्यालय) मध्ये चूक झाल्यास – गट दुरुस्ती.
-
कला शिक्षक/क्रीडा शिक्षक नसतानाही चुकीने ती नोंद केल्यास – दुरुस्ती.
२. शालार्थ / आश्रम शालार्थ / BMC स्टाफ आयडी नसलेले प्रशिक्षणार्थी:
वरील सर्व दुरुस्त्यांबरोबरच खालील दुरुस्तीही करता येणार:
-
शाळा व्यवस्थापन प्रकार दुरुस्त करणे.
दुरुस्ती करताना लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी
🔹 केवळ ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी चुकीची नोंदणी केली आहे त्यांनीच दुरुस्ती करावी.
🔹 अचूक नोंदणी झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी दुरुस्ती करताना सहभाग घेऊ नये.
🔹 ही शेवटची संधी असल्याने योग्य ती दक्षता घेणे आवश्यक आहे.
🔹 चुकीच्या माहितीमुळे पुढील प्रशिक्षण प्रक्रियेत अडथळे येण्याची शक्यता आहे.
प्रमुख दुरुस्ती पर्याय
१. शाळेचे नाव देवनागरीत नोंदविणे
अनेक प्रशिक्षणार्थ्यांनी शाळेचे नाव इंग्रजीत अथवा अपूर्ण स्वरूपात टाकले आहे. ही माहिती भविष्यकाळात आवश्यक कागदपत्रांमध्ये विसंगती निर्माण करू शकते.
२. प्रशिक्षण प्रकार दुरुस्ती (वरिष्ठ ⇄ निवड)
चुकीच्या वेतनश्रेणीत नोंदणी केल्यास, प्रशिक्षण पात्रतेच्या अटींची पूर्तता होत नाही, त्यामुळे हे तात्काळ दुरुस्त करणे आवश्यक आहे.
३. प्रशिक्षण गट दुरुस्ती
शाळेतील शिक्षकांचा गट चुकीने निवडल्यास, अनुचित प्रशिक्षण मॉड्युल प्राप्त होतो, जो प्रशिक्षणाचा उद्देशच भरकटवतो.
४. शिक्षक पदाचा प्रकार
कला किंवा क्रीडा शिक्षक नसतानाही ती निवड केल्यास, संबंधित प्रशिक्षणाच्या उपयुक्ततेवर विपरित परिणाम होतो.
५. शाळा व्यवस्थापन प्रकार
सरकारी, खासगी, अनुदानित, अंशतः अनुदानित अशा व्यवस्थापन प्रकारात चुकी झाल्यास, ती शाळेच्या प्रकाराशी संबंधित मान्यतेवर परिणाम करू शकते.
दुरुस्ती कशी करावी? – चरणबद्ध मार्गदर्शक
-
अधिकृत ऑनलाईन नोंदणी पोर्टलवर आपल्या लॉगिन तपशीलासह लॉगिन करा.
-
आपले नोंदणी फॉर्म उघडून “Edit” किंवा “दुरुस्ती” पर्याय निवडा.
-
आवश्यक ती सुधारणा नोंदवा – उदा. प्रशिक्षण प्रकार, गट, शाळेचे नाव इ.
-
सर्व बदलांची सावधपणे तपासणी करा.
-
“Submit” किंवा “संचित करा” बटणावर क्लिक करा.
-
सुधारित माहितीचा स्क्रीनशॉट अथवा पीडीएफ सेव करा.
सूचना आणि जबाबदाऱ्या – मुख्य मुद्दे
-
प्रत्येक नोंदणी केलेल्या शिक्षणाधिकाऱ्यांनी हे आदेश आपल्या कार्यक्षेत्रातील शिक्षकांपर्यंत पोहोचवावेत.
-
समजून घेऊनच दुरुस्ती करावी. चुकीची दुरुस्ती केल्यास ती अंतिम समजली जाईल.
-
पुनरदुरुस्तीची संधी देण्यात येणार नाही.
वरिष्ठ निवड श्रेणी प्रशिक्षण नावनोंदणी प्रक्रिया सुरू होण्यासाठी
अर्हता निकष:
✅ वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी:
नोंदणीच्या अंतिम दिनांक म्हणजेच ३० एप्रिल २०२५ पर्यंत किमान १२ वर्षे अर्हताकारी सेवा पूर्ण असावी.
✅ निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी:
नोंदणीच्या अंतिम दिनांक म्हणजेच ३० एप्रिल २०२५ पर्यंत किमान २४ वर्षे अर्हताकारी सेवा पूर्ण असावी.
नोंदणी कालावधी:
📅 नोंदणी सुरूवात: १५ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता
📅 नोंदणी शेवटची तारीख: २५ एप्रिल ०६ मे २०२५ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत
👉 नोंद घ्या: यानंतर नोंदणीस मुदतवाढ दिली जाणार नाही.
प्रशिक्षणाचे स्वरूप:
📝 सदरचे निवड श्रेणी प्रशिक्षण हे ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून, सर्व जिल्ह्यांमध्ये DIET (जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था) मार्फत एकाच कालावधीत घेण्यात येईल.
वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व सनियंत्रणाची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे सोपवण्यात आलेली आहे. यानुसार सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नावनोंदणीकरिता परिषदेमार्फत पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे. या पोर्टलवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय तसेच कला व शारीरिक शिक्षक (मान्यताप्राप्त) या चार गटातील पात्र शिक्षकांना नाव नोंदणी करणेसाठी पुढीलप्रमाणे दिलेल्या सूचनांनुसार कार्यवाही करावी. (नोंदणीबाबतचा सर्व तपशील संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.)
१) प्रशिक्षणाच्या नाव नोंदणीकरिता परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावरील ‘ प्रशिक्षणे’ या टॅब मधील वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण या टॅब वर क्लिक करून प्रकिया सुरु करावी.
२) वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी दिनांक ३०.०४.२०२५ पर्यंत एकूण १२ वर्षे अर्हताकारी सेवा पूर्ण होणे अनिवार्य आहे.
३) निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी दिनांक ३०.०४.२०२५ पर्यंत एकूण २४ वर्षे अर्हताकारी सेवा पूर्ण होणे अनिवार्य आहे.
४) प्रशिक्षण नोंदणी दिनांक १५.०४.२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजेपासून दिनांक २५.०४.२०२५ रोजी संध्याकाळी ०६.०० वाजेपर्यंत पर्यंत सुरु राहील. यासाठी कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.
५) सदरचे प्रशिक्षण हे ऑफलाईन पद्धतीने असून सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांचेमार्फत एकाच कालावधीत घेण्यात येणार आहे.
६) प्रस्तुत प्रशिक्षणासाठी पुढीलप्रमाणे ०४ गट करण्यात आलेले आहेत
- गट क्र. १ – प्राथमिक गट (इ. १ली ते ४ थी, इ. १ली ते ५ वी, इ.१ली ते ७ वी, इ. १ली ते ८ वी, इ.६वी ते ८ वी)
- गट क्र. २- माध्यमिक गट (इ.९ वी, १० वी)
- गट क्र. ३ – उच्च माध्यमिक गट (इ.११वी, १२ वी)
- गट क्र. ४- अध्यापक विद्यालय गट
मान्यताप्राप्त कला व शारीरिक शिक्षकांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातील संबंधित पर्याय निवडून प्रशिक्षणासाठी नोंदणी करावी.
(७) नोंदणी करण्यापूर्वी सोबत देण्यात आलेल्या SOP तसेच प्रशिक्षण व्हिडिओचे अवलोकन करूनच नोंदणी करावी.
८) प्रशिक्षणार्थीनी नोंदणी करण्याआधी आपली माहिती शालार्थ सेवार्थ/ बीएमसी पोर्टलवर जाऊन अचूक असल्याची खात्री करावी. जर काही दुरुस्ती असेल तर संबंधितांनी आधी शालार्थ / सेवार्थ/ बीएमसी पोर्टलवर वैयक्तिक माहिती अद्ययावत करूनच नंतर नाव नोंदणी करावी.
९) शालार्थ / सेवार्थ / बीएमसी प्रणालीवर अद्ययावत करावयाची माहिती खालील प्रमाणे
- • स्वतःचे नाव ( देवनागरी लिपी)
- • लिंग
- • जन्म दिनांक
- • पदनाम
- • Udise No.
- • जिल्हा
- • तालुका
- • शाळा व्यवस्थापन प्रकार
- • नियुक्ती दिनांक
- • शाळेचे नाव
- • मुख्याध्यापकाचे नाव
- • मुख्याध्यापकाचा संपर्क क्रमांक
- • व्यावसायिक अर्हता (सेवा कालावधीत व्यावसायिक अर्हता वाढवली असल्यास )
- • शैक्षणिक अर्हता (सेवा कालावधीत शैक्षणिक अर्हता वाढवली असल्यास )
- • मोबाईल क्रमांक
- • ई-मेल आयडी
१०) प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करतेवेळी संबंधितांनी आपला अचूक शालार्थ / सेवार्थ / बीएमसी ID, ई-मेल आय.डी. व मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती सोबत ठेवावी.
११) आपण नोंदणी करत असताना आपल्या शालार्थ / सेवार्थ / बीएमसी या पोर्टलवर नोंदवलेल्या ई-मेल आय.डी. वर OTP येईल. प्राप्त OTP दिलेल्या प्रणालीवर नोंदवून नोंदणी पूर्ण करावी. तसेच आपल्या शालार्थ/सेवार्थ/बीएमसी या पोर्टलवर नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP येईल प्राप्त OTP नोंदवून नोंदणी पूर्ण करावी. ई-मेल आय. डी. व मोबाईल क्रमांक यांचे verification होणे आवश्यक आहे. नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावरच प्रशिक्षणाच्या अद्ययावत सूचना येणार आहेत याची नोंद घ्यावी.
१२) नोंदणी प्रक्रिया अंतिम करण्यापूर्वी आपल्या भरलेल्या संपूर्ण माहितीची काळजीपूर्वक पडताळणी करावी. आपण निवडलेला प्रशिक्षण गट ( प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अध्यापक विद्यालय ) व प्रशिक्षण प्रकार ( वरिष्ठ व निवड ) यास पूर्णपणे आपण जबाबदार असणार आहात.
१३) प्रस्तुत प्रशिक्षणासाठी आवश्यक शासन निर्णय, सूचना व मार्गदर्शनपर संदर्भ साहित्य, व्हिडीओ, सर्व माहिती www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच प्रशिक्षणाशी निगडीत अद्ययावत सूचना वेळोवेळी या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहेत.
१४) या प्रशिक्षणासाठी संबंधित जिल्ह्याचे प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था हे जिल्ह्यासाठी प्रमुख अधिकारी असतील तर मुंबई शहर व उपनगर या जिल्ह्यांसाठी उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई हे जिल्ह्यासाठी प्रमुख अधिकारी असतील.
१५) इंटरनेट बँकिंग/ क्रेडीट/डेबिट कार्ड / UPI Payment या माध्यमातून प्रशिक्षण शुल्क भरता येईल.
१६) सदर प्रशिक्षण सशुल्क असल्याने प्रति प्रशिक्षणार्थी रु.२,०००/- (अक्षरी रुपये – दोन हजार मात्र) शुल्क ऑनलाईन पद्धतीने (Credit Card, Debit Card Internet Banking, UPI Payment) अदा करणे आवश्यक आहे.
१७) एकदा भरण्यात आलेले प्रशिक्षण शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही याबाबत परिषदेशी कोणताही पत्रव्यवहार करू नये. त्यामुळे सदर प्रशिक्षण शुल्क भरताना प्रशिक्षणार्थ्यांनी स्वतःची माहिकाळजीपूर्वक भरावी. प्रशिक्षण शुल्क व्यतिरिक्त सेवाशुल्क बँकेच्या guideline नुसार प्रशिक्षणार्थी लागू राहतील याची नोंद घ्यावी.
१८) ज्या कालावधीतील प्रशिक्षणासाठी शुल्क जमा केले आहे त्याच कालावधीसाठीच ते मर्यादित असेल.
१९) प्रशिक्षण नावनोंदणी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर नावनोंदणीची ऑनलाईन (रिसिप्ट) पावतीची PDF जतन करून ठेवावी सदर पावतीवर आपण नमूद केल्याप्रमाणे प्रशिक्षण गट व नोंदणी क्रमांक इ. तपशील असणार आहे. सदरची सर्व माहिती प्रशिक्षण पूर्ण करणेसाठी आवश्यक असणार आहे. तसेच सदरची पावती आपल्या नोंदणी केलेल्या ई मेलवर देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
२०) नोंदणी अर्ज भरताना काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास स्वतःच्या रजिस्टर Email आय.डी. वरून gradetraining@maa.ac.in या ई-मेल आय. डी. वर संपर्क करावा.
२१) नोंदणी केलेल्या शिक्षकांचे गटनिहाय प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात येईल. ऑफलाईन प्रशिक्षण आयोजनाचा कालावधी प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व, शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांचे संयुक्त स्वाक्षरीने पत्राद्वारे स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल. तसेच वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाच्या अधिक माहिती साठी वेळोवेळी www.maa.ac.in हे संकेत स्थळ पाहावे.
२२) प्रशिक्षण वर्ग मराठी माध्यमातून होईल. तथापि वाचनसाहित्य मराठी व्यतिरिक्त इंग्रजी व उर्दू माध्यमातून उपलब्ध असेल. याची नोंद घेण्यासाठीची सुविधा नाव नोंदणी प्रक्रियेच्या पोर्टलवर देण्यात आली आहे.उपरोक्त सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील चारही गटातील शिक्षक संवर्गातील संबंधितांना आपल्या स्तरावरून निदर्शनास आणून द्यावे व सदर प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षकांना नाव नोंदणी करण्यास अवगत करण्यात यावे प्रशिक्षणाच्या अधिकच्या समन्वयासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
- अभय परिहार- अधिव्याख्याता – संपर्क क्रमांक- ९००४११९९२६
- अभिनव भोसले – विषय सहाय्यक संपर्क क्रमांक- ८२०८८७९१५९
- तांत्रिक सहाय्य ( Trifrnd Pvt. Ltd.) – संपर्क क्रमांक- ९५११८७४३७३ (कार्यालयीन वेळेत)