इयत्ता पहिलीच्या इंग्रजी अध्यापनासाठी R2 पुस्तकावर आधारित ३४ मार्गदर्शक व्हिडीओ आणि शैक्षणिक दिनदर्शिका उपलब्ध
पुणे, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद: राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या इंग्रजी भाषा विभागामार्फत इयत्ता पहिलीच्या इंग्रजी विषयासाठी तयार करण्यात आलेली शैक्षणिक दिनदर्शिका आणि ३४ मार्गदर्शक व्हिडीओज आता संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
R1 (इंग्रजी माध्यम) व R2 (इतर माध्यमांतील विद्यार्थ्यांसाठी) इंग्रजी पुस्तकांतील घटकांवर आधारित हे व्हिडीओज व दिनदर्शिका तयार करण्यात आले असून, यामध्ये शिक्षकांना प्रत्येक तासिका कशी घ्यावी, याचे मार्गदर्शन केले आहे.
इयत्ता पहिलीसाठी R1 साठी ५२५ तासिका आणि R2 साठी ३१५ तासिकांनुसार ही शैक्षणिक दिनदर्शिका तयार करण्यात आली आहे. तसेच, R2 पुस्तकावर आधारित ३४ व्हिडीओजमध्ये पाठ्यपुस्तकातील घटकांचे सादरीकरण, अध्यापनाचे नियोजन, मूल्यांकन, पूरक कृती व शिक्षकांसाठी सखोल मार्गदर्शन समाविष्ट आहे.
या व्हिडीओजचा आणि दिनदर्शिकेचा उपयोग प्राथमिक शिक्षकांनी दैनंदिन अध्यापनात करावा, असे आवाहन परिषदेकडून करण्यात आले आहे.
सदर व्हिडीओज आणि दिनदर्शिका www.maa.ac.in या संकेतस्थळावर समन्वय विभाग > इंग्रजी भाषा विभाग या टॅबखाली उपलब्ध आहेत. तसेच थेट लिंक पुढीलप्रमाणे आहे:
यापुढील काळात उर्वरित तासिकांचे व्हिडीओज देखील तयार करून वेबसाईटवर अपलोड करण्यात येणार असल्याचेही परिषदेने जाहीर केले आहे.