शालेय नेतृत्व विकास : राष्ट्रीय परिषद २०२६-२७ | मुख्याध्यापकांसाठी महत्त्वाची संधी
शाळेच्या गुणवत्तावाढीत मुख्याध्यापक आणि शालेय नेतृत्वाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. शाळांमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या अध्ययनात, सर्वांगीण विकासात आणि शाळेच्या कार्यपद्धतीत सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या शाळा नेतृत्वाला राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी National Conference on School Leadership 2026-27 आयोजित करण्यात येत आहे.

या परिषदेत शासकीय आणि शासन अनुदानित शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य आणि Head Teacher सहभागी होऊ शकतात.
राष्ट्रीय शालेय नेतृत्व परिषद २०२६-२७
National Centre for School Leadership (NCSL), NIEPA, New Delhi यांच्या माध्यमातून ही राष्ट्रीय परिषद आयोजित केली जात आहे. विविध शाळांमध्ये प्रभावी शालेय नेतृत्वामुळे झालेल्या परिवर्तनशील कामांची माहिती देशभरातील इतर शाळांपर्यंत पोहोचवणे, चांगल्या पद्धतींची देवाणघेवाण करणे आणि शालेय गुणवत्तावाढीसाठी उपयुक्त अनुभव शेअर करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
परिषदेमध्ये सहभागी होणाऱ्या शाळांच्या उत्कृष्ट कार्यपद्धती, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि शाळा परिवर्तनाच्या अनुभवांना राष्ट्रीय स्तरावर मांडण्याची संधी मिळणार आहे.
कोण सहभागी होऊ शकते?
या परिषदेसाठी खालील शाळांमधील शालेय प्रमुख सहभागी होऊ शकतात:
- शासकीय शाळा
- शासन अनुदानित शाळा
- मुख्याध्यापक
- प्राचार्य
- Head Teacher
केस स्टडी किंवा व्हिडिओ डॉक्युमेंटरी सादर करण्याची संधी
NCSL-NIEPA कडून शालेय प्रमुखांकडून पुढीलपैकी एका स्वरूपात सहभाग नोंदविण्यासाठी सादरीकरण मागविण्यात आले आहे.
१. Case Study
शाळेच्या परिवर्तनाची माहिती देणारी २,५०० ते ३,००० शब्दांची केस स्टडी सादर करता येईल.
केस स्टडीमध्ये शाळेत राबविलेल्या प्रभावी उपक्रमांची, आलेल्या अडचणींची, केलेल्या उपाययोजनांची आणि त्यातून झालेल्या परिणामांची माहिती छायाचित्रांसह मांडता येईल.
२. Video Documentary
शाळेतील परिवर्तन आणि उल्लेखनीय कामाचे ८ ते १० मिनिटांपेक्षा जास्त नसलेले Live Video Documentary सादर करता येईल.
केवळ छायाचित्रांचा संग्रह असलेला व्हिडिओ स्वीकारला जाणार नाही.

परिषदेचे प्रमुख विषय
राष्ट्रीय परिषदेसाठी शालेय नेतृत्वाशी संबंधित विविध विषय निश्चित करण्यात आले आहेत.
१. Competency-Based Teaching, Learning and Assessment
क्षमताधिष्ठित अध्यापन, अध्ययन आणि मूल्यमापनामध्ये शालेय नेतृत्वाची भूमिका.
ताज्या घडामोडी (Live Updates)
२. Diverse, Equitable and Inclusive Schools
विविधता, समानता आणि सर्वसमावेशक शिक्षणासाठी शाळा नेतृत्व.
३. Indian Knowledge Systems (IKS)
भारतीय ज्ञानपरंपरेच्या माध्यमातून शालेय नेतृत्वाचा पुनर्विचार.
४. Vocational Education and Skilling
व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्यविकासाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविणे.
५. Digital Transformation
तंत्रज्ञानाधारित अध्यापन आणि अध्ययनासाठी डिजिटल परिवर्तनाचे नेतृत्व.
६. Mental Well-Being and Socio-Emotional Learning
विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य आणि सामाजिक-भावनिक अध्ययनासाठी शालेय नेतृत्व.
७. Community and Stakeholder Partnerships
शाळा परिवर्तनासाठी पालक, समुदाय आणि विविध भागधारकांसोबत प्रभावी भागीदारी.
८. Innovation for School Excellence
शाळेच्या उत्कृष्टतेसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम आणि नेतृत्व.
९. Global Citizenship Education
जागतिक नागरिकत्व शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी शाळेची भूमिका.
अर्ज किंवा सादरीकरणासाठी आवश्यक माहिती
Case Study किंवा Video Documentary सादर करताना खालील माहिती देणे आवश्यक आहे:
- शाळेचे संपूर्ण नाव व पोस्टल पत्ता
- शालेय प्रमुखाचे नाव
- ई-मेल आयडी
- मोबाईल क्रमांक
भाषा: English | Hindi | Indian Languages
अंतिम तारीख
३१ ऑक्टोबर २०२६
या तारखेपर्यंत आपले Case Study किंवा Video Documentary सादर करणे अपेक्षित आहे.
ई-मेल: ncsl.csl@niepa.ac.in
महत्त्वाच्या सूचना
परिषदेसाठी सहभागी होणाऱ्यांनी खालील बाबी लक्षात घ्याव्यात:
- सादर केलेली Case Study किंवा Video Documentary नवीन आणि यापूर्वी सादर न केलेली असावी.
- प्रत्येक सहभागीला केवळ एकच Entry सादर करता येईल.
- Entry म्हणून Case Study किंवा Video Documentary यापैकी एक पर्याय निवडावा.
अधिक माहितीसाठी
परिषद, सहभागाची प्रक्रिया आणि इतर तपशील जाणून घेण्यासाठी National Centre for School Leadership (NCSL), NIEPA यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.













