निपुण महाराष्ट्र (Nipun Maharashtra) टप्पा २ (२०२६-२७): इयत्ता १ ली ते ५ वी नवे अध्ययन स्तर व ॲप माहिती
२०२५-२६ मधील निपुण महाराष्ट्र (Nipun Maharashtra) अभियानाची यशस्वी वाटचाल
डिसेंबर २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत राज्यातील सुमारे १.६ लाख शिक्षकांनी इयत्ता दुसरी ते पाचवीच्या अंदाजे ३२ लाख विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तरांची दरमहा नोंद केली.
डिसेंबर २०२५ च्या तुलनेत मार्च २०२६ मध्ये विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमतेत विषयनिहाय १२ ते १५ टक्के वाढ दिसून आली.
राज्यातील ‘निपुण शाळांचे’ प्रमाण डिसेंबर २०२५ मधील ८ टक्क्यांवरून मार्च २०२६ मध्ये थेट २० टक्क्यांपर्यंत पोहोचले.
निपुण महाराष्ट्र (Nipun Maharashtra) टप्पा २ (२०२६-२७): कोणते मोठे बदल झाले?
| इयत्ता | मराठी भाषा (अध्ययन क्षेत्र) | गणित विषय (अध्ययन क्षेत्र) |
इयत्ता पहिली | मौखिक भाषा, वाचन व लेखन | अवकाशीय संबोध, आकार, आकृतिबंध, संख्याज्ञान, संख्यांवरील क्रिया व मापन |
इयत्ता दुसरी | मौखिक भाषा, वाचन व लेखन | अवकाशीय संबोध, आकार, आकृतिबंध, संख्याज्ञान, चलनी व्यवहार, संख्यांवरील क्रिया व मापन |
इयत्ता तिसरी ते पाचवी | वाचन व लेखन | आकार, आकृतिबंध, संख्याज्ञान, चलनी व्यवहार, संख्यांवरील क्रिया व मापन |
निपुण महाराष्ट्र (Nipun Maharashtra) अभियान टप्पा २ (२०२६-२७): इयत्ता पहिलीचा समावेश, नवे अध्ययन स्तर आणि संपूर्ण माहिती
शाळा, शिक्षक आणि पालकांसाठी महत्त्वाच्या सूचना
शिक्षकांचे उद्बोधन व प्रशिक्षण
पालक सहभाग आणि UDISE+ पोर्टल अद्ययावतीकरण
UDISE+ लिंक: निपुण महाराष्ट्र (Nipun Maharashtra) ॲपमध्ये पालकांचे संपर्क क्रमांक थेट UDISE+ पोर्टलमधून जोडले जात आहेत. त्यामुळे सर्व शाळांनी विद्यार्थी आणि पालकांचे मोबाईल क्रमांक UDISE+ वर अचूक व अद्ययावत असल्याची खात्री करावी.
पालक सभा: चाचणीपूर्वी प्रत्येक शाळेने किमान एक पालक सभा आयोजित करून त्यांना ॲपवरील सुविधा आणि घरच्या घरी सराव कसा घ्यावा याचे मार्गदर्शन करावे.
ताज्या घडामोडी (Live Updates)
घरगुती सराव: पालकांनी दररोज मुलांसोबत वाचन, गोष्टी सांगणे, चित्रांवर चर्चा करणे आणि ॲपमधील सोपे भाषिक व गणितीय खेळ खेळावेत यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे. यात शाळा व्यवस्थापन समिती आणि माता-पालक गटाची मदत घ्यावी.
स्तरनिहाय गट अध्यापन व पूरक सहाय्य
नियमित आढावा आणि पर्यवेक्षण
निपुण शासन निर्णय
| अनु. क्र. | विषय | डाउनलोड |
|---|---|---|
| 1. | NIPUN FLN GR | Open (262.03 KB) ![]() |
| 2. | Nipun Krutikarykram GR | Open (310.08 KB) ![]() |
| 3. | शासन निर्णय – Engaging Mothers Groups in FLN Mission | Open (367.91 KB) ![]() |















